उस्मानाबाद : स्वतःच्या मेहुणीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय पुरुषाने (नाव-...
उस्मानाबाद : स्वतःच्या मेहुणीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 40 वर्षीय पुरुषाने (नाव- गाव गोपनीय) दि. 01.11.2020 रोजी कौटुंबीक वादातून आपल्या 22 वर्षीय मेव्हणीस मोबाईल फोनद्वारे अनेकदा अश्लील शिवीगाळ केली. यावर मेव्हणीने त्याचा कॉल घेने बंद केले असता त्या पुरुषाने अन्य मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन पुन्हा अश्लील शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 509 अन्वये गुन्हा नोंदवाला आहे.
खटला दाखल केल्याचा कारणावरुन मारहाण
परंडा: खटला दाखल केल्याचा कारणावरुन दि. 01.11.2020 रोजी 17.00 वा. लोणी, ता. परंडा येथील रेखा बुरगुटे व राजकन्या शिंदे यांच्या गटांचा परस्परांशी वाद झाला. यात दोन्ही गटांतील स्त्री- पुरुष सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, साखळी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रेखा बुरगुटे व राजकन्या शिंदे यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 149, 504 अन्वये 2 गुन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS