नळदुर्ग: उत्तम घुगे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 26.10.2020 रोजी 20.00 वा. सु. नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकाजवळील सेतु केंद्रासमोर ...
नळदुर्ग: उत्तम घुगे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दि. 26.10.2020 रोजी 20.00 वा. सु. नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकाजवळील सेतु केंद्रासमोर आपली हिरो एचएफ डीलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 5396 ही उभी केली होती. ती मोटारसायकल त्यांना 20.30 वा. सु. ठेवल्या जागी आढळली नसल्याने आपल्या मुलाने ती नेली असेल असा त्यांचा गैरसमज झाला. परंतु आज दि. 02.11.2020 रोजी पिता- पुत्र चर्चेतून मोटारसायकल चोरीस गेल्याचे लक्षात आले. अशा मजकुराच्या उत्तम घुगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा: गणपत जाधव, रा. महादेव गल्ली, उमरगा यांनी दि. 29.10.2020 रोजी रात्री 09.00 वा. सु. कोरेगाव रोड उमरगा येथील तुळशीदास वराडे यांच्या पाणी केंद्राजवळ ट्रॅक्टर ट्रेलरसह लावला होता. त्यातील ट्रेलर क्र. एम.एच. 25 जी 2792 हा दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी आढळला नाही. यावरुन तो अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या गणपत जाधव यांनी आज दि. 02.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS