तुळजापूर: आपण एटीएम मधून पैसे काढताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुळजापुरात एका व्यक्तीला एका भामट्याने कार्डची आदलाबदल करून एक लाखाला ...
तुळजापूर: आपण एटीएम मधून पैसे काढताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुळजापुरात एका व्यक्तीला एका भामट्याने कार्डची आदलाबदल करून एक लाखाला गंडा घातला आहे.
फुलचंद भोसले, रा. गंधोरा, ता. तुळजापूर हे दि. 31.10.2020 रोजी तुळजापूर येथील जुन्या बसस्थानका शेजारच्या वक्रांगी एटीएम केंद्रात पैसे काढत असतांना एका अनोळखी युवकाने त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली तसेच फुलचंद भोसले यांचा पासवर्ड बघीतला. नंतर त्या भामट्याने भोसले यांच्या एटीएम कार्ड द्वारे वेळोवेळी विविध केंद्रांतून एकुण 1,08,000/-रु. रक्कम काढली. अशा मजकुराच्या फुलचंद भोसले यांनी काल दि. 01.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS