ही कागदपत्रे आवश्यक असतील , जाणून घ्या तपशीलवार माहिती नवी दिल्ली - सध्याच्या काळात आधारकार्ड हे भारतीय नागरिकत्त्वाचे वैध प्रमाण म्हणून गण...
ही कागदपत्रे आवश्यक असतील , जाणून घ्या तपशीलवार माहिती
नवी दिल्ली - सध्याच्या काळात आधारकार्ड हे भारतीय नागरिकत्त्वाचे वैध प्रमाण म्हणून गणले जाते अथवा एखाद्या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या पत्त्याचे सर्वात वैध कागदपत्र असल्याचे मानण्यात येते आणि या आधारकार्डावरती संबंधित नागरिकाचा पत्ता वैध किंवा योग्य तोच असणे खूप जरूरी असते, नागरिकांना याचा फायदा असा होतो की बॅंकेत नवीन खाते उघडणे, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेणे, नवीन सिमकार्ड खरेदी करणे, नवीन गॅसची जोडणी करणे, वीजेचे नवे कनेक्शन घेणे अशा अनेक कामांमध्ये आधारकार्डद्वारे बऱ्याच सवलती, सूट मिळत असते.
पण जर तुमचा पत्ताच वैध नसेल तर या सवलतींपासून तुम्ही दूर रहाल पण आता चिंता करायचे कारण नाही आधारकार्डवरचा तुमचा पत्ता अगदी काही मोजक्या स्टेप्सद्वारे ऑनलाईन अपडेट करता येणार आहे. आधारकार्ड देणारी संस्था UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने त्यासाठी गरजेच्या दस्तएवजांची यादी दिली आहे, ज्याद्वारे तुमच्या आधारकार्डवरील पत्ता अद्ययावत केला जाऊ शकतो. त्यांच्यातर्फे यासंबंधी नुकतेच एक ट्वीट करण्यात आले व त्यात असे म्हंटले आहे की, जिथे आपला पूर्ण पत्ता प्रविष्ट केलेला आहे अशी पत्त्याची कागदोपत्रे आहे. UIDAI ने दिलेल्या कागदपत्रांची यादी ही खालीलप्रमाणे आहेत.
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंगचे लायसन
- पासपोर्ट
- बॅंकेचे स्टेटमेंट किंवा पासबुक
- रेशनचे कार्ड
- वीजेचे बील – तीन महिन्यांपूर्वीपर्यंतचे
- पाण्याचे बील -तीन महिन्यांपूर्वीपर्यंतचे
- शासकीय कार्यालयीन छायाचित्रित ओळखपत्र किंवा पीसयूद्वारे दिलेले कार्यालयीन ओळखपत्र
- मालमत्ता करभरणीची पावती – एक वर्षांहून अधिक जुनी नसलेली
- क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट – एक महिन्यापेक्षा अधिक जुने नसलेले
- विमा संरक्षणाची पॉलिसी
- नोंदणीकृत संस्थेने लेटरहेडवर जारी केलेले पत्र ज्यावर छायाचित्र असणे आवश्यक
- शस्त्र परवाना
- बॅंकेने लेटरहेडवर सादर केलेले पत्र ज्यावर छायाचित्र असणे आवश्यक
- मनरेगा जॉब कार्ड
- पेंशनर्स कार्ड
- स्वतंत्रतासेनानी कार्ड
- किसान पासबुक
- CGHS/ ECHS कार्ड
- मान्यताप्राप्त शैक्षणिकसंस्थेकडून जारी केलेले पत्र ज्यावर विद्यार्थ्यांचा फोटो असेल
- खासदार आमदार एमएलसी किंवा राजपत्रीत अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेल्या पत्त्याचे प्रमाणपत्र
- UIDAI च्या प्रमाणपत्राच्या नमुन्यावर असलेला पत्ता
आपणास पत्ता ऑनलाईन अपडेट करायचा असेल तर आधी UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर My Aadhar या विभागा अंतर्गत Update Demographic data Online हा पर्याय उपलब्ध असेल. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ येईल जेथे नाव, जन्मतारिख, लिंग, पत्ता आणि भाषा ऑनलाईन अपडेट करायचा पर्याय आहे. तेथे हवा तो बदल करून नंतर Proceed to Update Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आधार नंबर सहित कॅप्चे कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करावे लागेल.तो ओटीपी व्हेरिफाय झाल्यावरती आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून पत्त्यामध्ये बदल करता येऊ शकतोय.
COMMENTS