ऑफिस टाईम संपण्याच्या दीड तास अगोदर गायब उस्मानाबाद - जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी ऑफिस टाईम संपण्याच्या दीड तास अगोद...
ऑफिस टाईम संपण्याच्या दीड तास अगोदर गायब
उस्मानाबाद - जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी ऑफिस टाईम संपण्याच्या दीड तास अगोदरच घरी जात असल्याने या कार्यालयात येणाऱ्या लोकांना हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे .
जागेचा पीआर कार्ड, शेतीचे टोच नकाशे, जमिनीविषयक प्रमाणपत्रे, घेण्यासाठी तसेच शेतीची मोजणी करण्यासाठी या कार्यालयात लोकांची गर्दी असते. एक तर दिलेल्या मुदतीत या कार्यालयातून कागदपत्रे मिळत नाहीत., त्यात अनेक कर्मचारी सदैव गैरहजर असतात.
आज दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता, ९० टक्के कर्मचारी घरी गेल्याचे सांगण्यात आले. ऑफिस टाईम सव्वा सहा वाजता संपतो, त्या अगोदरच कर्मचारी गायब होत आहेत. या कामचुकार कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
COMMENTS