लोहारा - लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा जिजाऊ ब...
लोहारा- लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्याचे अनेक प्रकरण निकाला अभावी धूळखात पडले आहेत, यामुळे शेतकऱ्याची कुचंबना होत आहे.
तसेच श्रावण बाळ,संजय गांधी योजनेतील लाभार्थी प्रस्ताव करून ही अद्याप बैठक घेण्यात आली नाही. तर संगायो श्रावण बाळ योजने मध्ये अनेक निराधार प्रस्ताव दाखल करून ही अनेक जाचक अटी लावल्यामुळे निराधाराची फरफट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण बाळ योजना संजय गांधी योजनेतील प्रस्तावित फाईल गहाळ होत असल्याने तात्काळ लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे.
तसेच लोहारा येथील तहसील कार्यालयात जवळपास तीन नायब तहसीलदार पदे कार्यरत आहेत. एक मुख्य तहसीलदार पद सध्या रिक्त आहे. सध्या एक नायब तहसीलदार रजेवर आहे, दुसरे प्रतिनियुक्तीवर व एक सध्यस्थितीत कार्यालयात कार्यरत आहेत. मुख्य तहसीलदार पद कार्यालयात रिक्त आहे. अद्याप या ठिकाणी तहसीलदार नियुक्ती झाली नाही.
यामुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्लॉटच्या सुनावण्या थांबल्या आहेत. अनेक कामे, वाद विवाद आदी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता तात्काळ लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे. यावर चार दिवसात कार्यवाही करावी अन्यथा जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी.
या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रांजनाताई श्रीकांत हासूरे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
COMMENTS