ढोकी: ताहिर सलिम मोमीन, रा. गांधीनगर, कळंब हे दि. 09.12.2020 रोजी 19.30 वा. सु. ढोकी येथील रस्त्याने रुग्णवाहिका वाहन क्र. के.ए. 05 एके 468...
ढोकी: ताहिर सलिम मोमीन, रा. गांधीनगर, कळंब हे दि. 09.12.2020 रोजी 19.30 वा. सु. ढोकी येथील रस्त्याने रुग्णवाहिका वाहन क्र. के.ए. 05 एके 4686 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने पिकअप क्र. एम.एच. 24 जे 5470 हा निष्काळजीपणे चालवून ताहिर मोमीन चालवत असलेल्या रुग्णवाहीकेस धडक दिल्याने या अपघातात ताहिर मोमीन हे जखमी झाले. अशा मजकुराच्या ताहिर मोमीन यांनी काल दि. 10.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. कलम- 279, 337 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: तुकाराम गुंड, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर यांनी दि. 09.12.2020 रोजी 16.30 वा. सु. वडगाव (लाख) शिवारातील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एएच 0744 ही निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कार क्र. एम.एच. 25 एएल 2228 हिस पाठीमागुन धडक दिली. या अपघातात तुकाराम गुंड हे स्वत: जखमी झाले तर नमूद कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या कार चालक- लक्ष्मीकांत मारुतीराव गवते, रा. तुळजापूर यांनी दि. 10.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: गणेश सिध्दाराम कोरे, वय 30 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे दि. 08.12.2020 रोजी 19.30 वा. सु. नळदुर्ग येथील हॉटेल दरबार समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ट्रक क्र. एम.एच. 25 यु 1466 हा चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. एम.एच. 46 एआर 5886 हा निष्काळजीपणे चालवून गणेश कोरे चालवत असलेल्या ट्रकला समोरुन धडक दिल्याने गणेश कोरे हे गंभीर जखमी होउन त्यांच्या ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या गणेश यांचे वडील- सिध्दाराम कोरे यांनी आज दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 427 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: चालक- मेहाराम गोपाराम कुकणा, रा. राजस्थान यांनी दि. 09.12.2020 रोजी 15.25 वा. सु. तुळजापूर येथील सोलापुर- तुळजापूर पर्यायीमार्गाच्या वळणावर टँकर क्र. जी.जे. 12 बीडब्ल्यु 7036 हा निष्काळजीपणे चालवल्याने तो अनियंत्रीत होउन पलटल्याने या अपघातात चालक- कुकणा हे गंभीर जखमी झाले. तसेच टँकरचे व टँकरमधील डिझेल सांडल्याने आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या बलवंतसिंग चौहान, रा. राजस्थान यांनी आज दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद टँकर चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण: नरसिंग चंदर डोंगरे, वय 38 वर्षे, रा. माळकरंजा, ता. कळंब हे दि. 11.11.2020 रोजी 06.30 वा. सु. माळकरंजा येथील रस्त्याने सायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने न्यु हॉलंड ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 0196 हा निष्काळजीपणे चालवून नरसिंग डोंगरे यांच्या सायकलला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर नरसिंग डोंगरे हे दि. 01.12.2020 रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या नरसिंग यांचे वडील- चंदर डोंगरे यांनी आज दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS