तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल उस्मानाबाद - जिल्हयातील एका 17 वर्षीय मुलीचे फेसबुकवर एका अनोळखी तरूणाशी प्रेम प्रकरण जुळले असता त्या अनोळखी तरू...
तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद - जिल्हयातील एका 17 वर्षीय मुलीचे फेसबुकवर एका अनोळखी तरूणाशी प्रेम प्रकरण जुळले असता त्या अनोळखी तरूणाने ‘‘तुझे वय 18 वर्षे पुर्ण होताच मी तुझ्याशी ग्न करेल.’’ असे तिला वचन दिले होते. ते दोघे अनेकदा एकमेकांशी चॅटींग करीत असत तसेच चॅटींग दरम्यान एकमेकांस व्हिडीओ काॅल करून एकमेका समोर नग्न होत असत.
नोव्हेंबर 2020 मध्ये ती मुलगी 18 वर्ष वयाची झाली असता तीने त्या तरूणास काॅल करून त्याच्याकडे विवाह करण्यासाठी तगादा लावला. त्या तरूणाने तिला सांगितले की, ‘‘आपल्या दोघांच्या जाती या वेगळया असल्याने माझ्या आई-वडीलांचा आपल्या लग्नास विरोध आहे. म्हणुन मी तुझा नाद सोडुन दिला आहे.’’असे सांगुन त्याने स्वतःचा मोबाईल फोन बंद केला. अश्या मजकुराच्या त्या मुलीने दिलेल्या प्रथम खबरे वरून दि.30/11/2020 रोजी भा.द.सं.कलम 354 सह पोक्सो कायदा कलम 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दोन अल्पवयीन मुलींचे लैंगींक शोषण
उस्मानाबाद जिल्हयातील एका खेडेगावातील 13 वर्षीय व 6 वर्षीय अश्या दोन्ही बहीणी (नाव-गाव गोपनिय) गावातील एकापुरुषाच्या घरी वेळोवेळी खेळण्यास जात होत्या.यावेळी दि.26/10/2020 ते दि.29/11/2020 या एका महीन्याच्या काळात त्या पुरुषाने खाऊचे आमिष दाखवुन त्यांचे वेळोवेळी लैंगींक शोषण . अश्या मजकुराच्या त्या मुलींच्या आईने दिलेल्या प्रथम खबरे वरून दि.30/11/2020 रोजी भा.द.सं.कलम 376 सह पोक्सो कायदा कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS