परंडा : पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दिपक भारत जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांनी दि. 06.12.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील अंबाबाईच्...
परंडा: पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दिपक भारत जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांनी दि. 06.12.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील अंबाबाईच्या मंदीराजवळ भाऊबंद- शनी दिलीप जाधव यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने पायावर वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शनी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा: चेतनकुमार लक्ष्मण बोडगे, रा. लोहारा हे दि. 05.12.2020 रोजी 19.30 वा. सु. आपल्या घरी होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- आबुजर समद पठाण व शारुख मेहमुद पठाण या दोघानी चेतनकुमार बोडगे यांच्या घरात घुसून चेतनकुमार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चेतनकुमार बोडगे यांनी दि. 06.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 327, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: नरसिंग रक्माजी बनसोडे, रा. नंदगाव, ता. तुळजापूर यांच्या भावाने गावकरी- संतोष कांबळे यांच्या ट्रकवरील चालक नोकरी सोडल्याच्या कारणावरुन संतोष कांबळे व अमर कांबळे या दोघा भावांनी नरसिंग बनसोडे यांना दि. 04.12.2020 रोजी 19.00 वा. सु. गावातील चौकात शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नरसिंग बनसोडे यांनी आज दि. 07.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS