उमरगा: 1)शरद चव्हाण, रा. बलसुर तांडा 2)महावीर राठोड, रा. होदलुर तांडा 3)संजय जाधव, रा. पळसगांव तांडा हे तिघे दि. 23.12.2020 रोजी उमरगा ये...
उमरगा: 1)शरद चव्हाण, रा. बलसुर तांडा 2)महावीर राठोड, रा. होदलुर तांडा 3)संजय जाधव, रा. पळसगांव तांडा हे तिघे दि. 23.12.2020 रोजी उमरगा येथील बिर्याणी गल्लीमध्ये संगणकावर ऑनलाईन चक्री जुगाराचे साहित्यासह एक एलईडी टीव्ही, एमआय मोबाईल फोन, जिओ कंपनीचे नेट सेटर व रोख रक्कम असा एकुण 18,060 ₹ चा माल बाळगले असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळले.
ढोकी: 1)सोमनाथ पवार 2)दत्तात्रय शेळके, दोघे रा. तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद हे दि. 23.12.2020 रोजी गावातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी कल्याण मटका जुगाराचे एकत्रीत साहित्य व 1,620 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळले.
नळदुर्ग: महंमद याकुब शेख, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 23.12.2020 रोजी नळदुर्ग बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्य व 550 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग च्या पथकास आढळले.
उस्मानाबाद - आनंदनगर: 1)भारत वाघमारे, रा. शिंगोली 2)रमेश धोत्रे, रा. वरुडा हे दोघे दि. 23.12.2020 रोजी शिंगोली येथील ‘धम्मदीप पानटपरी’ येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व 520 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळले.
येरमाळा: किरण सोमनाथ कसबे, रा. भिमनगर, येरमाळा, ता. कळंब हे आज दि. 24.12.2020 रोजी राहत्या गल्लीत कल्याण मटका जुगाराचे साहित्य व 650 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पो.ठा. येरमाळा च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गेन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS