उस्मानाबाद- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संलग्न उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी निवड संदर्भात येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा विभ...
उस्मानाबाद- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संलग्न उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी निवड संदर्भात येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी तर जिल्हा सचिवपदी दैनिक मराठवाडा केसरीचे बिभीषण लोकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या आदेशानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या नव्याने कार्यकारिणीची बांधणी करण्यात येत आहे.उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि उस्मानाबाद येथील दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणी निवड संदर्भात बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये सर्वानुमते दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली.
तर उर्वरित कार्यकारणी मध्ये जिल्हा सचिव पदी दैनिक मराठवाडा केसरीचे बिभीषण लोकरे,जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक लोकशासनचे श्रीराम क्षीरसागर,जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक मराठवाडा नेताचे प्रशांत कावरे,आणि दैनिक एकमतचे संतोष शिंदे तसेच जिल्हा संघटकपदी दैनिक त्रीशक्तीचे सय्यद मुसा,सहसंघटकपदी दैनिक लातूर समाचारचे रामेश्वर डोंगरे,सहकोषाध्यक्षपदी दैनिक सामनाचे राकेश कुलकर्णी,सहसचिवपदी साप्ताहिक विकास देशाचे मिलिंद कुलकर्णी तर मार्गदर्शक म्हणून प्रेस फोटोग्राफर कालिदास म्हेत्रे तर सदस्य म्हणून दैनिक जनमतचे आकाश नरोटे दैनिक तरुण भारत संवादचे सचिन वाघमारे, दैनिक देशोन्नतीचे बाळासाहेब अंदुरकर,धाराशीव नगरीचे हेमंत कुलकर्णी यांची एकमताने निवड निश्चित करण्यात आली.निवड करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीचे राज्य कार्यकारिणीने मान्यता देऊन हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नूतन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS