तामलवाडी: अब्दुल रमजान शेख, रा. हिप्परगा (तळे), ता. सोलापूर हे दि. 10.12.2020 रोजी 20.00 वा. सु. सुरतगाव, ता. तुळजापूर येथील पुलाजवळील रस्...
तामलवाडी: अब्दुल रमजान शेख, रा. हिप्परगा (तळे), ता. सोलापूर हे दि. 10.12.2020 रोजी 20.00 वा. सु. सुरतगाव, ता. तुळजापूर येथील पुलाजवळील रस्त्याने कार चालवत जात होते. यावेळी कार क्र. एम.एच. 13 एझेड 9779 मध्ये आलेल्या 1)तानाजी राम गायकवाड, रा. अणदुर 2)राहुल सिद्रामप्पा पाटील, रा. बेळम, ता. उमरगा 3)आकाश प्रकाश कुचेकर, कारंबा नाका, सोलापूर यांनी त्यांची कार अब्दुल शेख यांच्या कारला आडवी लावून, “दादा एन्ट्रीचे 500/-रु. दे.” असे अब्दुल शेख यांना म्हणुन त्यांच्या जवळील 500/-रु. जबरीने काढून घेतले. अशा मजकुराच्या अब्दुल शेख यांनी आज दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
ढोकी: विलास घुटे, रा. रुई (ढोकी), ता. उस्मानाबाद यांच्या रुई (ढोकी) गट क्र. 130 मधील शेतातील तुषारसिंचन संचाचे नोजल- 8 नग अज्ञात चोरट्याने दि. 10.12.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या विलास घुटे यांनी आज दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS