उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दिसवापासून महिला आणि मुलीवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एक लैंग...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दिसवापासून महिला आणि मुलीवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एक लैंगीक अत्याचार, एक विनयभंग आणि एक अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका खेडेगावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 11.12.2020 रोजी 17.00 वा. सु. घरी एकटी असल्याचा फायदा घेउन गावातीलच एका युवकाने तीच्या घरी जाउन तीच्यावर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने आज दि. 12.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
विनयभंग
उस्मानाबाद - एका खेडेगावातील एक महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 11.12.2020 रोजी 08.00 वा. सु. घरासमोरील पत्रा शेडमध्ये स्नान करत असतांना गल्लीतीलच 2 युवक तीला पाहण्याचा प्रयत्न करुन तीचे छायाचित्र टिपत असतांना तीने पाहिले. नंतर तीने त्या युवकांना जाब विचारला असता त्यांनी त्या महिलेस, “मी फोटो काढेन नाहीतर काहीही करीन तु विचारणार कोण?” असे उध्दटपणाची भाषावापरुन धमकावले. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (क), 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 10.12.2020 रोजी 19.30 वा. सु. खाजगी शिकवणीस गेली असता ती घरी न परतल्याने कुटूंबीयांनी तीचा शोध घेतला असता काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दि. 11.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS