उस्मानाबाद- तालुक्यातील दाऊतपुर येथील स्वस्त धान्य दुकान स्वतःचे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दिलीप सोलंकरवर ढोकी पोलीस स्टेशनम...
उस्मानाबाद- तालुक्यातील दाऊतपुर येथील स्वस्त धान्य दुकान स्वतःचे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दिलीप सोलंकरवर ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी त्यास अटक न केल्याने दिलीप सोलंकरवर हा शासकीय कार्यालयात दिसून राजरोस फिरताना आला.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या दाऊतपूर या संस्थेकडे रास्त भाव दुकान होते या संबंधीची तक्रार बाळासाहेब सुभेदार यांनी तहसिलदार, उस्मानाबाद यांच्याकडे केली होती. स्वस्त धान्य दुकानातून चुकीच्या पद्धतीने धान्य वितरित होत असून काळया बाजारात धान्य व रॉकेल विक्री करून लोकांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते व या प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषी विरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.
यावेळी तत्कालीन तहसिलदार यांनी तत्कालीन नायब तहसीलदार राजेश जाधव यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असता येथील स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार झाल्याचे निदर्शनास आले तसेच या प्रकरणी दिलीप नामदेव सोलंकर याने नियमबाह्य व बेकायदेशीररित्या स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी घेतले असल्याचे समोर आले तसेच यावेळी झालेल्या चौकशीमध्ये दिलीप सोलंकर याने संस्थेशी आणि दुकानाशी कुठलाही संबंध नसताना मी स्वतः चेअरमन असल्याचे सांगत सुनावणी दरम्यान हजेरी लाऊन स्वाक्षऱ्या केल्या तसेच बनावट प्रोसिडिंग बुक सादर केले ही बाब बाळासाहेब सुभेदार यांनी तत्कालीन तहसिलदार आणि तत्कालीन नायब तहसिलदार (पुरवठा) यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाची फसवणूक केले प्रकरणी दिलीप सोलंकर यांच्या विरुद्ध दि. २५ डिसेंबर २०२० रोजी ढोकी पोलीस ठाण्यात विद्यमान नायब तहसिलदार राजाराम केलुरकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मात्र अद्यापही सोलंकर या आरोपीला अटक करण्यात आली नाही संबंधित आरोपी पोलीसांच्या समोर आणि शासकीय कार्यालयात बिनदिक्कत फिरत असल्याचे दिसते आहेत एरवी शुल्लक कारणांसाठी पोलिसांकडून सामान्य लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे मात्र सोलंकर यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला अभय दिल्याने पोलिसांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे
COMMENTS