उस्मानाबाद (श.): अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने काल दि. 26.12.2020 रोजी उस्मानाबाद शहरात वेगवे...
उस्मानाबाद (श.): अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने काल दि. 26.12.2020 रोजी उस्मानाबाद शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत 1)मिनाबाई काळे 2)जोली चव्हाण, दोघी रा. इंदीरानगर, उस्मानाबाद या राहत्या गल्लीत पत्रा शेडसमोर चार घागरींमध्ये एकुण 40 लि. गावठी दारु (किं.अं. 2,400 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
दुसऱ्या घटनेत शितल काळे, रा. पारधी पिढी, उस्मानाबाद या राहत्या पारधी पिढी येथे बकेट मध्ये 20 लि. ताडी अंमलीद्रव्य (किं.अं. 1,000 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
कळंब: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने काल दि. 26.12.2020 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत कल्याण पवार, रा. हावरगांव, ता. कळंब हे गावातील शिवारात देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) बाळगले असतांना आढळले.
दुसऱ्या घटनेत तोलाबाई पवार, रा. कळंब या शेळी बाजार मैदान, कळंब येथे कॅनमध्ये 15 लि. गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
ढोकी: संजय कोळी, रा. ईर्ला, ता. उस्मानाबाद हे दि. 26.12.2020 रोजी गावातील ‘दोस्ती ढाबा’ मध्ये देशी- विदेशी दारुच्या 53 बाटल्या (किं.अं. 4,520 ₹) अवैधपणे बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.
बेंबळी: परमेश्वर वाघमारे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद हे दि. 26.12.2020 रोजी गावातील सुभेदार हॉटेलच्या मागे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) अवैधपणे बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
उमरगा: 1)दत्ता कोळी, रा. उमरगा 2)दयानंद राठोड, रा. पळसगांव तांडा हे दोघे दि. 26.12.2020 रोजी आरोग्यनगर, उमरगा येथे 9 लि. गावठी दारु (किं.अं. 800 ₹) अवैधपणे बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS