कळंब: प्र शांत महादेव जगताप, रा. बोर्डा, ता. कळंब हे दि. 27.12.2020 रोजी 18.30 वा. होळकर चौक, कळंब येथील रस्त्याने महेंद्रा कमांडर वाहन क्र...
कळंब: प्रशांत महादेव जगताप, रा. बोर्डा, ता. कळंब हे दि. 27.12.2020 रोजी 18.30 वा. होळकर चौक, कळंब येथील रस्त्याने महेंद्रा कमांडर वाहन क्र. एम.एच. 25 ए 617 मधून 180 मि.ली. देशी दारुच्या 140 बाटल्या (किं.अं. 12,480 ₹) अवैधपणे वाहून नेत असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
बेंबळी: मंगेश बरबडे, रा. आरणी, ता. लोहारा हे दि. 27.12.2020 रोजी भंडारी गावातील समाधान ढाब्याच्या मागे एका पिशवीत 180 मि.ली. देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 980 ₹) अवैधपणे बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
नळदुर्ग: शिवाजी कदम, रा. मानमोडी, ता. तुळजापूर हे दि. 27.12.2020 रोजी गावातील स्वत:च्या पानटपरीत 180 मि.ली. देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 416 ₹) अवैधपणे बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS