उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज रोजी लैंगीक अत्याचार, विनयभंग, चोरी, अपघात आदी गुन्हयाची नोंद झाली आहे. लैंगीक अत्याचार उस्मानाबाद...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज रोजी लैंगीक अत्याचार, विनयभंग, चोरी, अपघात आदी गुन्हयाची नोंद झाली आहे.
लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद - जिल्ह्यातील एका खेडेगावातील एका युवकाने शेजारच्या गावातील एका 18 वर्षीय तरुणीस (नाव- गाव गोपनीय) दि. 16.12.2020 रोजी 21.00 वा. सु. भविष्य पाहण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर गावाबाहेरील शेतात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडला प्रकार कोणास सांगीतल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने काल दि. 24.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (1), 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
विनयभंग
उस्मानाबाद : एका खेडेगावातील एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 24.12.2020 रोजी दुपारी 02.30 वा. झाडाखाली झोपलेली असतांना गावातीलच एका पुरुषाने तेथे येउन तीच्या सोबत झोंबाझोंबी करुन, “तुझ्या नवऱ्या पेक्षा मी तुला जास्त सुख देईन.” असा लैंगीक अनुग्रह केला. यावर त्या महिलेने आरडा- ओरड, झटापट करुन त्या पुरुषाच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. घडला प्रकार त्या महिलेने त्या पुरुषाच्या भावास सांगीतला असता त्या दोन्ही भावांनी महिलेस, “तोंड बंद ठेव नाहीतर तुझ्यासह तुझ्या मुलांना ठार करु.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (अ), 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
उमरगा: प्रविण शाहुराज माने, रा. उमरगा यांच्या कोरेगांववाडी रस्त्यालगतच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा सरोवर विद्युत पाणबुडी पंप व दोन स्टार्टर अज्ञात चोरट्याने दि. 23 व 24.12.2020 दरम्यानच्या रात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रविण माने यांनी आज दि. 25.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
उमरगा: अज्ञात चालकाने दि. 24.12.2020 रोजी 11.50 वा. मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एसी 7427 ही नारंगवाडी शिवारातील नाईचाकुर फाटा येथे निष्काळजीपणे चालवून इरेश महादेवय्या मठ, रा. आलुर, ता. उमरगा हे चालवत असलेल्या कारला समोरुन धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालक स्वत: जखमी झाला असुन कारचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या इरेश मठ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS