उस्मानाबाद -केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-...
उस्मानाबाद -केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-2021 ते 2024 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केलेले आहे.यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील अनुसुचित जातीच्या व नवबौध्द घटकातील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोगामध्ये कार्यरत वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक यांना लाभ देण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने सदयस्थितीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोंगामध्ये कार्यरत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक यांनी कार्यालयीन वेळेत निम्न स्वाक्षरीत यांचे कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,उस्मानाबाद यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
COMMENTS