उस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील एका डॉक्टरने ४७० रुपयांची चप्पल ऑनलाईन बुक केली, बुक ...
उस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील एका डॉक्टरने ४७० रुपयांची चप्पल ऑनलाईन बुक केली, बुक केलेली ऑर्डर रद्द झाली आणि समोरच्याने पैसे परत करण्याच्या बहाण्याने ओटीपी पाठवून या डॉक्टरास १ लाख २७ हजारास गंडा घातला .
उस्मानाबाद शहरातील शासकीय महिला रूग्णालयातील डाॅ.चंद्रकांत लामतुरे यांनी शॉपक्लुज या ऑनलाईन पोर्टल वर 470 रू. ऑनलाइन भरून एक चप्पल मागिवली होती. काही कारणाने कंपनीने ती ऑर्डर रद्द झाल्याचे डाॅ.लामतुरे यांना एस.एम.एस.व्दारे कळविले. यावर डाॅ. लामतुरे यांनी शॉपक्लुज वेबसाईटवरील एका मोबाईल फोनशी दि.30/11/2020 रोजी संपर्क साधला.
यावेळी समोरील व्यक्तीने पैसे परत करण्याच्या बहाण्याने डाॅ.लामतुरे यांना त्यांच्या ए.टी.एम.-डेबीट कार्ड वरील 16 अंकी क्रमांक व कार्डच्या पाठीमागील 03 अंकी सी.व्ही.व्ही. क्रमांक विचारला असता डाॅ.लामतुरे यांनी सारासार काही एक विचार न करता त्यास ते क्रमांक सांगितले. यावेळी डाॅ. लामतुरे यांच्या मोबाईल फोनवर 1,27,714 रू. ट्रान्सफर होण्याकरीता आलेला ओ.टी.पी.संदेश डाॅ. लामतुरे यांनी वाचुन समजावुन न घेता त्यातील ओ.टी.पी. क्रमांक त्या समोरील व्यक्तीस सांगितला.
अश्या प्रकारे यातुन डाॅ.लामतुरे यांच्या एस.बी.आय. बॅंक खात्यातील 1,27,714 रू. रक्कम समोरील व्यक्तीने अन्य खात्यांवर स्थलांतरीत केली. अश्या मजकुराच्या प्रथम खबरे वरून दि.01/12/2020 रोजी भा.दं.सं.कलम 420 सह मा.तं.का.कलम 66(सी),(डी) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. दररोज किमान एक तरी तक्रार दाखल होत आहे. यासंदर्भात बातम्या प्रकाशित होऊनही लोक दक्षता घेत नाहीत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सायबर ग्राम काय झोपले आहे का मग एक तरी निकालाचा केस आली आहे का सर्व केस अशाच एका खाली एक दमून आहेत त्यांनी अशी एक केस दाखवावी किती उघड झाली आहे व व पुढील फिर्यादी चा फायदा झाला आहे
ReplyDelete