उस्मानाबाद - परंडा पोलीस स्टेशन मध्ये सहा वर्षांपूर्वी अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होता, यातील फरार...
उस्मानाबाद - परंडा पोलीस स्टेशन मध्ये सहा वर्षांपूर्वी अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होता, यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंधक कायद्यान्वये परंडा पो.ठा. गु.र.क्र. 14 / 2014 हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी- भाऊसाहेब गंगाधर खरात, रा. जालना हा पोलीसांना तपासकामी पाहिजे (Wanted) होता. त्याचा ठावठिकाणा निष्पन्न करुन स्था.गु.शा. च्या सपोनि- निलंगेकर, पोकॉ- पांडुरंग सावंत, अशोक ढगारे यांच्या पथकाने त्यास आज दि. 28.12.2020 रोजी जालना येथून ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
COMMENTS