उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णाच...
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णाची संख्या जास्त तर बरे होण्याचे प्रमाण कमी यात तफावत दिसून येत आहे. ३ जानेवारी रोजी २५ रुग्णाची भर पडली तर फक्त १० रुग्ण बरे होवून घरी परतले.
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत सध्या कोरेानाच्या गंभीर रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अधिक काळजीपूर्वक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या १६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २५ जण आयसीयूमध्ये असून, ३२ जणांना ऑक्सिजन सुरू आहे. ३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. म्हणजे ६० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत
जिल्ह्यातील कोेरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोराेनाची भीती संपुष्ठात आली होती. परिणामी नागरिकांनी स्वत:च्या तसेच सामाजिक आरोग्याकडे दुर्लक्ष सुरू केले. मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्स न पाळणे, यामुळे हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या प्रत्यक्षात कमी दिसत असली तरी तपासणी करण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अत्यंत गंभीर प्रकृती झाल्यानंतर रूग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे उपचारावर मर्यादा येऊन रूग्णाचे मृत्यू ओढवत आहेत.
कोरोना मीटर
👉उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेले रुग्ण - १६४०९
👉 बरे होवून गेलेले रुग्ण - १५६८२
👉 एक्टीव्ह रुग्ण - १६२
👉 एकूण मृत्यू - ५६५
COMMENTS