उस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली....
उस्मानाबाद - . पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 20 जानेवारी रोजी जुगार विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. यात पोलीसांनी जुगार साहित्य व 17,795 ₹ रोख रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खालील व्यक्तींविरुध्द 21 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले.
पोलीस ठाणे, ढोकी: राजेंद्र ढवारे हे ढोकी येथील पेट्रोल पंप चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 450 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, उमरगा: संजय जाधव व सतीष राठोड हे बलसूर तांडा, ता. उमरगा येथील पत्रा शेडसमोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 4,190 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, लोहारा: अजित राजपूत हे माकणी, ता. लोहारा येथील आपल्या पानटपरीसमोर तर रसुल सय्यद हे माकणी चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 1,480 ₹ बाळगले असतांना आढळले.
खंडु कदम हे भातागळी येथील चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 850 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, भुम: सुधाकर शेळके हे गोलाई चौक, भुम येथे तर साहिल पठाण हे साठे गल्लीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 785 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, कळंब: महेबुब अत्तार हे कळंब बसस्थानकासमोरील टपरीसमोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 1,290 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, परंडा: कांतीलाल सोनवणे हे देवळाली, ता. परंडा येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 520 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, वाशी: शिवानंद आसवले हे पारा येथील बीएसएनएल मनोरा परिसरात जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 660 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, येरमाळा: अमर पलंगे हे येरमाळा येथील पत्रा शेडमध्ये जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 965 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: अंकुश घोडके हे अणदुर, ता. तुळजापूर येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 730 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, तुळजापूर: संग्राम नाईकवाडी हे तुळजापूर येथील दिपक चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 510 ₹ बाळगले असतांना आढळले.
विठ्ठल देवकर हे वासुदेव गल्लीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 860 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, आनंदनगर: भानुदास वाघमारे हे शहरातील शिफा पानटपरी समोर जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 420 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): राजु पारसे हे देशपांडे स्थानक येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 700 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, बेंबळी: ज्ञानेश्वर गुंड हे पाडोळी येथे जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 885 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, शिराढोन: गणपत वाघमारे हे गावातील दिलखुश पानटपरी समोर, रोहित वाघमारे हे गावातीलच आपल्या पानटपरी समोर तर जगन्नाथ बोदांडे हे आपल्या पानटपरीत जुगार चालवण्याच्या उद्देशाने कल्याण मटका जुगार साहित्य व एकुण रोख रक्कम 2,040 ₹ बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, मुरुम: शिवशंकर विरभद्रप्पा हे येणेगुर येथील हनुमान चौकात जुगार चालवण्याच्या उद्देशाने मिलन मटका जुगार साहित्य व रोख रक्कम 460 ₹ बाळगले असतांना आढळले.
“अवैध मद्य विरोधी कारवाई.”
पोलीस ठाणे, शिराढोन: अवैध गावठी दारु निर्मीती होत असल्याच्या खबरेवरुन शिराढोन पो.ठा. च्या पथकाने 20 जानेवारी रोजी शिराढोन पारधी पिढी वस्तीवर 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यावेळी शिराढोन पारधी पिढी येथील रहिवासी 1)सिंधुबाई नाना काळे 2)सिमा अरुण काळे 3)सुभाष दत्ता काळे हे तीघे शिराढोन पारधी पिढी येथे 3 वेगळ्या ठिकाणी 3 बॅरेल मधील एकुण 400 लि. मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ आणि एकुण 35 लि. अवैध गावठी दारु व निर्मीती वस्तू (साहित्यासह किं.अं. 8,550 ₹) बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर साहित्य व मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, उमरगा: अतिश रामराव चौधरी, रा. कदेर, ता. उमरगा हे 19 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घराजवळ विदेशी दारुच्या 102 बाटल्या (किं.अं. 11,600 ₹) विनापरवाना बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन उमरगा पोलीसांनी विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS