उस्मानाबादच्या तहसीलदारांना तात्त्काळ अहवाल देण्याचा आदेश उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावळा गो...
उस्मानाबादच्या तहसीलदारांना तात्त्काळ अहवाल देण्याचा आदेश
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावळा गोंधळ झाला आहे. उमेदवारांचे चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हाची आदलाबदली केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी उस्मानाबादच्या तहसीलदारांना अर्जामध्ये नमूद मुद्दयांवर स्वयंस्पष्ट अहवाल आजच ( ६ जानेवारी ) या कार्यालयास सादर करावा, असा आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण ?
बाळासाहेब सुभेदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उमेदवार प्रवीण बनसोडे यांना प्रथम ऑटोरिक्षा हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी देण्यात आले होते. मात्र उस्मानाबाद तहसिलदार यांच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बनसोडे यांचे चिन्ह बदलून कप बशी हे करण्यात आले आहे. प्रवीण बनसोडे यांच्याप्रमाणेच इतर ३१ उमेदवारांचे अशाच पद्धतीने चिन्हांमध्ये आदलाबदली करण्यात आली आहे. त्यामुळे दाऊतपूर ग्रामपंचायतीची निवडणूक स्थगित करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी.
यासंदर्भात उस्मानाबाद टुडेने ५ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकरणी काय कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
यापूर्वीचे वृत्त वाचा
COMMENTS