उस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञातान...
उस्मानाबाद - माणिक चौक, उस्मानाबाद येथील कर्तव्य कॉम्प्लेक्स या दुकानाच्या शटरचे कुलूप दि. 11.01.2021 रोजी रात्री 02.00 वा. सु. अज्ञाताने तोडून आतील विविध कंपन्यांचे तयार कपडे, सदरे- विजारी, संगीत उपकरणे असा एकुण 39,750 ₹ चा माल चोरुन नेला होता. यावरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 12 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत दाखल आहे.
गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री निलंगेकर, पोना- कावरे, पोकॉ- अशोक ढगारे, दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रणाचा अभ्यास सुरु केला. अखेर हा गुन्हा उस्मानाबाद येथील मणिष भेंडेगावे उर्फ महाबळेश्वर, रा. काकानगर व आतिश शिंदे, रा. शिंगोली यांसह दोन अल्पवयीन युवकांनी (विधीसंघर्षग्रस्त बालक) केला असल्याचे समजले. पथकाने त्यांना 16 जानेवारी रोजी शहरातून ताब्यात घेतले. गुन्हा करण्यासाठी वापरलेली विनाक्रमांकाची यामाहा मोटारसायकल व ॲक्टीव्हा स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 3788 सह चोरी केलेला उपरोक्त नमूद माल जप्त केला आहे. तसेच उर्वरीत कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
चंदनाची झाडे चोरणारा आरोपी मालासह अटकेत
उस्मानाबाद - विसर्जन विहीर परिसरातील शासकीय निवासस्थानांच्या आवारातील 3 चंदनाची झाडे अज्ञात चोरट्याने अंधाराचा व दाट झाडीचा फायदा घेउन दि. 03.12.2020 रोजी 02.00 ते 04.00 वा. सु. तोडून चोरुन नेल्यावरुन आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 299 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दाखल आहे. गुन्हा तपासात स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, संतोष गव्हाणे, पोकॉ- आर्सेवाड यांच्या पथकाने गुन्हा कार्यपध्दतीचा अभ्यास केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन सारोळा, ता. बार्शी येथील रहिवासी- दिपक काळे यास दि. 16 रोजी लाकूड कापन्याचे साहित्य व नमूद चोरीतील चंदनाच्या लाकडांसह ताब्यात घेतले असुन उर्वरीत कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
ज्योतीबाचीवाडी येथे चोरी
भुम: ज्योतीराम दिलीप वरबडे, रा. ज्योतीबाचीवाडी, ता. भुम यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच. 25 एसी 4401 ही दि. 17.12.2020 रोजी 23.45 वा. गावातील शेतात लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने ती मोटारसायकल चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या ज्योतीराम वरबडे यांनी काल दि. 16.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS