उस्मानाबाद - सोलापूर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणांबरोबर एक महिन्यापूर्वी प्रेम जुळले. त्या तरुणाला भ...
उस्मानाबाद - सोलापूर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणांबरोबर एक महिन्यापूर्वी प्रेम जुळले. त्या तरुणाला भेटण्यासाठी ती उस्मानाबादला आली. दोघे लॉजवर गेले आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर सोडून दिले. यावरून त्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर येथील एका 19 वर्षीय तरुणीचे (नाव- गाव गोपनीय) उस्मानाबाद जिल्ह्यातील एका अनोळखी तरुणाशी मोबाईल फोनद्वारे अवघ्या महिनाभरापुर्वीच प्रेम संबंध जुळले होते. यावर त्या दोघांनी एकमेकांस भेटण्याचे ठरवल्याने दि. 30.12.2020 रोजी 11.00 वा. “टॉप शिवून येते.” अशी थाप तरुणीने आईला मारली आणि ती उस्मानाबादला पोहचली.
उस्मानाबाद बसस्थानकावर ते दोघे एकमेकांस पहिल्यांदा भेटले व त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली. यावर त्या तरुणाने तीला कारमध्ये बसवून शहरातील एका लॉजवर नेउन “आपण पुणे येथे जाउन लग्न करु.” असे सांगून तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्या अज्ञात तरुणाने तीला दि. 31.12.2020 रोजी रात्री 02.15 वा. सोलापूर येथे तीच्या घराजवळ कारद्वारे नेउन सोडले. अशा मजकुराच्या त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधीत अज्ञात तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS