तुळजापूर : सुरेंद्र गणेश सातपोते, रा. सोलापूर यांनी आपली होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 सीव्ही 8860 ही दि. 28.12.2020 रोजी 11.00 वा. सु...
तुळजापूर: सुरेंद्र गणेश सातपोते, रा. सोलापूर यांनी आपली होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 सीव्ही 8860 ही दि. 28.12.2020 रोजी 11.00 वा. सु. पंचायत समिती, तुळजापूर समोर लावली असता अज्ञाताने चोरली होती. यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे गु.र.क्र. 15 / 2021 हा 379 नुसार दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात तुळाजापूर पो.ठा. चे पोनि- श्री मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- पवार, पोहेकॉ- तानाजी माळी, शिंदे, पोकॉ- अमोल पवार यांच्या पथकाने धनेगाव, ता. तुळजापूर येथील रहिवासी- सुनिल हुलपा भोसले, वय 42 वर्षे यास दि. 15.01.2021 रोजी धनेगाव शिवारातून चोरीच्या नमूद मोटारसायकलसह अटक केली आहे.
2 गुन्ह्यांतील 2 पाहिजे आरोपी अटकेत
उस्मानाबाद जिल्हा: शिराढोन पो.ठा. गु.र.क्र. 28 / 2013 भा.दं.सं. कलम- 379, 411, 34 या चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- बिलाल अब्दुल मजीद कुरेशी, वय 45 वर्षे, रा. अंबाजोगाई, जि. बीड यास शिराढोन पो.ठा. च्या पथकाने काल दि. 15.01.2021 रोजी अंबाजोगाई शहरातून ताब्यात घेतले आहे. तर, परंडा पो.ठा. गु.र.क्र. 80 / 2014 भा.दं.सं. कलम- 326, 147, 143 या मारहाणीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- चिवलाबाई काळे, रा. सामनगाव, ता. भुम यांना आज दि. 16.01.2021 रोजी परंडा पो.ठा. च्या पथकाने सामनगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे.
चोरी
उस्मानाबाद (श.): बुऱ्हाणोद्दीन जैनोद्दीन सय्यद, रा. काझी गल्ली, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर क्र. एम.एच. 25 व्ही 4047 ही दि. 19.11.2020 रोजी 11.00 वा. उस्मानाबाद शहरातील देशपांडे स्टॅण्ड येथील वडाच्या झाडाखाली लावली असता अज्ञात व्यक्तीने ती मोटारसायकल चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या बुऱ्हाणोद्दीन सय्यद यांनी काल दि. 15.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS