पोलीस ठाणे, उमरगा: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने आज दि. 06.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिक...
पोलीस ठाणे, उमरगा: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने आज दि. 06.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत लक्ष्मण लिंबोळे, रा. तुरोरी, ता. उमरगा हे राहत्या गल्लीत 20 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) बाळगले असतांना आढळले.
दुसऱ्या घटनेत विठ्ठल थोरात, रा. गुंजोटी, ता. उमरगा हे राहत्या गल्लीत 20 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, भुम: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन भुम पो.ठा. च्या पथकाने दि. 05.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत रोहन पौळ, रा. पाथरुड, ता. भुम हे एका पिशवीत 180 मि.ली. देशी दारुच्या 17 बाटल्या (किं.अं. 884 ₹) गावातील ‘तुळजाभवानी हॉटेल’ समोर बाळगले असतांना आढळले.
दुसऱ्या घटनेत प्रकाश शिंदे, रा. वालवड, ता. भुम हे 180 मि.ली. देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 720 ₹) राहत्या पत्रा शेडमध्ये बाळगले असतांना आढळले.
पोलीस ठाणे, येरमाळा: रामचंद्र पवार, रा. रत्नापुर, ता. कळंब हे आज दि. 06.01.2021 रोजी गावातील ‘हॉटेल बांगर बंधु’ समोरील पानटपरीमध्ये एका पिशवीत 180 मि.ली. विदेशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 2,000 ₹) अवैधपणे बाळगले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, आनंदनगर: जया पवार, रा. रमाईनगर, उस्मानाबाद या आज दि. 06.01.2021 रोजी राहत्या गल्लीत 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 650 ₹) बाळगल्या असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): किरण काळे, रा. हातलादेवी परिसर, उस्मानाबाद हे दि. 06.01.2021 रोजी राहत्या घरासमोर 30 लि. अवैध गावठी दारु व 200 लि. गावठी दारु निर्मीचा द्रवपदार्थ (किं.अं. 14,400 ₹) बाळगले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, मुरुम: गोविंद राठोड, रा. शिवाजीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा हे दि. 06.01.2021 रोजी राहत्या घरासमोर 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 600 ₹) बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): मनोज पापडे, रा. उस्मानाबाद हे दि. 05.01.2021 रोजी बावी फाटा येथील ‘रानवारा हॉटेल’ च्या पाठीमागे एका पिशवीत 180 मि.ली. देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780 ₹) अवैधपणे बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, वाशी: सिंधुबाई काळे, रा. पारा, ता. वाशी या दि. 05.01.2021 रोजी राहत्या घरामागे एका कॅनमध्ये 7 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 540 ₹) बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 10 गुन्हे नोंदवले आहेत.
COMMENTS