चोरी कळंब : बाळासाहेब शेळके रा. बोंडा ता.कळंब यांनी त्यांची हिरो स्प्लेन्डर मोटार सायकल क्र एमएच 25 एए 4741 ही दि.11.01.2021 रोजी 14.15 व...
चोरी
कळंब : बाळासाहेब शेळके रा. बोंडा ता.कळंब यांनी त्यांची हिरो स्प्लेन्डर मोटार सायकल क्र एमएच 25 एए 4741 ही दि.11.01.2021 रोजी 14.15 वा सु साठे चौक कळंब येथे लावली असता अज्ञात चोरटयाने चोरली आहे.अशा मजकुराच्या शेळके यांनी दि.14.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
अपघात
उस्मानाबाद - सुंदराबाई माळी रा.पळसप ता.उस्मानाबाद या दि.08.01.2021 रोजी 09.00 वा सु उस्मानाबाद बसस्थानकासमोरून पायी जात होत्या. या वेळी मोटारसायकल क्रमांक एमएच 25 एटी 0193 च्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन सुंदराबाई माळी यांना पाठीमागुन धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाता नंतर नमुद चालक जखमींस वैदयकीय उपचाराची तजवीज न करता तसेच अपघाताची खबर पोलीसांना न देता घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला.
अशा मजकुराच्या सुंदराबाई माळी यांनी वैदयकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात मोटार सायकल चालकाविरुध्द भा.द.सं. कलम 279,337,338 सह मो.वा.का. कलम 134 अ.ब, 184 अंतर्गत गुन्हा दि.14.01.2021 रोजी नोंदवला आहे.
मारहाण
उमरगा: थोरलेवाडी ता.उमरगा येथील महादेव कोराळे यांच्या शेतातील राहत्या घरावर गावकरी 1.दत्ता चिंचोळे, 2.बालाजी मिसाळे, 3.रणजित म्याकाळे, 4.सायबान्ना खवडे, 5.गुंडाप्पा यमपाळे, 6.रामलिंग कोराळे, 7.गोपाळ म्याकाळे, 8.पंडीत कोराळे, 9.अनिल कोराळे, 10.यलप्पा यंपाळे, 11.साहेबांना पाटील, 12.तुळशिराम चिंचोळे, 13.हणमंत व्हनाळे 14.विठठल दापेगावे, 15.अनिल म्याकाळे, 16.अविनाश मिसाळे अशा सर्वांनी दि.10.01.2021 रोजी दगडफेक करुन घरासमोरील टाटा मॅजिक वाहन व मोटार सायकलची तोडफोड केली. तसेच विहीरीवरील विद्युतपंप विहीरीत टाकुन देवून आणि गोठा जाळुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या महादेव कोराळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद 16 व्यक्तीविरूध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 427, 436 अंतर्गत गुन्हा दि.14.01.2021 रोजी नोंदवला आहे.
COMMENTS