उस्मानाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास ...
उस्मानाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहनांत मालवाहून नेणाऱ्या 5 चालकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत खालीलप्रमाणे 5 गुन्हे 24 फेब्रुवारी रोजी नोदवण्यात आले.
चालक- 1)रमेश सुतार, रा. येणेगुर 2)लखन जाधव, रा. उमरगा यांनी आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा उमरगा बसस्थानकासमोरील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उमरगा येथे दोन गुन्हे नोंदवण्यात आले.
चालक- धनंजय माने, रा. खामकरवाडी, ता. वाशी यांनी आपले पिकअप वाहन येडशी येथील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उस्मानाबाद (ग्रा.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला.
चालक- सखाराम जाधव, रा. परंडा यांनी आपले पिकअप वाहन वारदवाडी चौकातील रस्त्यावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने परंडा येथे गुन्हा नोंदवण्यात आला.
चालक- भिमाशंकर घोडके, रा. नळदुर्ग यांनी टाटा एस वाहना बाहेर आलेल्या अवस्थेत लोखंडी सळयांची नळदुर्ग बसस्थानकासमोरील महामार्गावरुन वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवण्यात आला.
मनाई आदेशांचे उल्लंघन 33 पोलीस कारवायांत 9,600/-रु. दंड वसूल
उस्मानाबाद : कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानाबाद पोलीस दलातर्फे खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 9 कारवायांत- 1,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 10 कारवायांत- 5,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 14 कारवायांत 2,800/-रु. दंड प्राप्त झाला आहे.
COMMENTS