उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शम्शोद्दीन गाझी दर्गा उरूस दि.25 फेब्रुवारी-2021 ते दिनांक 06 मार्च-2021 दरम्यान साजरा होणार आह...
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शम्शोद्दीन गाझी दर्गा उरूस दि.25 फेब्रुवारी-2021 ते दिनांक 06 मार्च-2021 दरम्यान साजरा होणार आहे. उरूस शांततेत पार पडावा, तसेच वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे व कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. जर तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी म्हणून मी पोलीस अधीक्षक संदीप भा. पालवे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद तालुक्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ट दर्जाचे अधिकान्यांना दि. 25 फेब्रुवारी-2021 रोजीचे 00:01 वा. ते दि. 06 मार्च 2021 रोजीचे 24:00 वाजे पावेतो खालील अधिकार प्रदान करीत आहे.
रस्त्यांवरील किंवा रस्त्यांने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे,अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी जाव्यात किंवा कोणत्या मार्गानी जावू नयेत ते मार्ग विहीत करणे.सर्व मिरणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी प्रतिमा पुजनाच्या सर्व ठिकाणी आणि प्रतिमा पुजनांच्या वेळी, कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल, अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे.
सर्व रस्त्यांवरील, नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाचे, कपडे धुण्याचे ठिकाणी, जागे मध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात सड़के जवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमण करणे. अगर त्यावर नियंत्रण ठेवणे.सक्षम अधिकान्यांनी महराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
जो कोणी वरील नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
Bill Peters is a Los Angeles-based MarketWatch reporter who covers earnings. He mentioned the digital business had a “really good shot” at being “a contributor” to full-year Ebitda next yr, ahead of schedule. If you got caught in the endless seek for an ideal 코인카지노 movie on Netflix, it's time to stop scrolling.
ReplyDelete