कळंब: अक्षय भारत दोडके, वय 21 रा. अंदोरा, ता. कळंब हा कोल्हापूर येथे नर्सिंग प्रशिक्षण घेत होता. त्याने 19 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदोरा ये...
कळंब: अक्षय भारत दोडके, वय 21 रा. अंदोरा, ता. कळंब हा कोल्हापूर येथे नर्सिंग प्रशिक्षण घेत होता. त्याने 19 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदोरा येथील राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली होती. यासंबंधी कळंब पो.ठा. येथे अनैसर्गीक मृत्यु प्रकरणी फौ.प्र.सं. कलम- 174 अंतर्गत सुरु असलेल्या चौकशीत मयताचे पिता- भारत सदाशिव दोडके यांनी लेखी निवेदन दिले की, “कोल्हापूर येथील नर्सिंग प्रशिक्षणादरम्यान अजित शामराव कांबळे, रा. कोल्हापूर यांनी अक्षय यास फरशी, कपडे धुण्यास सांगणे तसेच घरगुती कामे करण्यास सांगुण त्याचा छळ केल्याने अक्षय याने आत्महत्या केली आहे.” यावरुन कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद - एक विवाहित महिला (नाव- गाव गोपनीय) 24 फेब्रुवारी रोजी दुपारी घरात एकटी असल्याची संधी साधून तीच्याच वस्तीत राहणाऱ्या एका तरुणाने तीच्या घरात घुसून तीच्याशी लैंगीक उद्देशाने झोंबाझोंबी करुन तीचा विनयभंग केला. तसेच घडला प्रकार कोणास सांगीतल्यास ठार मारण्याची धमकी देउन तीला शिवीगाळ केली. अशा मजकुमराच्या संबंधीत महिलेले दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
येरमाळा: चालक- रामेश्वर मोराळे, रा. वडजी, ता. वाशी यांनी 24 फेब्रुवारी रोजी येरमाळा गावातील बार्शी रस्त्यावर फोक्सवॅगन कार क्र. एम.एच. 12 एलजे 0053 ही निष्काळजीपणे चालवल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याबाजूस उभ्या असलेल्या लोकांना व वाहनांना धडकली. या अपघातात महाविर आचलारे व रुक्मीनी घेवारे हे दोघे जखमी झाले तर बाजूच्या वाहनांचे आर्थिक नुकसान झाले. या अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता व जखमीस उपचारकामी तजवीज न करता संबंधीत कार चालक अपघातस्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या अनिकेत आचलारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उस्मानाबाद - 16 वर्षे वय, 4.5 फुट उंची व सावळा रंग असलेला अभिषेक परमेश्वर देटे, रा. रुई, ता. उस्मानाबाद हा दि.08.02.2021 रोजी येडशी येथील बसस्थानकात आला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी न परतल्याने कुटूंबीयांनी त्याचा शोध घेतला असता त्याच्या विषयी काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन कोणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या पिता- परमेश्वर शेकू देटे यांनी दि. 11.02.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अभिषेकच्या बेपत्ता होण्या विषयी काही उपयुक्त माहिती असल्यास उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे.
चोरी
तुळजापूर: धोंडीराम पवार, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर यांनी त्यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीपी 2042 ही 21 फेब्रुवारी रोजी 19.30 वा. तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाजवळील सुलभ शौचालयासमोर लावली असता अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धोंडीराम पवार यांनी 24 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: सुनिल जगदाळे यांनी आपल्या वाशी येथील शेतात गुंडाळून ठेवलेली सुमारे 140 मीटर विद्युत केबल अज्ञाताने दि. 21 -22 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुनिल जगदाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS