उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलाने 24 फेब्रुवारी रोजी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द कारवाई करुन जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार...
उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलाने 24 फेब्रुवारी रोजी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द कारवाई करुन जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत खालीलप्रमाणे 5 गुन्हे नोंदवले आहेत.
1)उमरगा बसस्थानकाजवळील विद्युत उपकेंद्राच्या बाजूस उमरगा पोलीसांना छापा टाकला असता मटका चालक- बशीर शेख, रा. हमीदनगर, उमरगा हे ज्ञानेश्वर पवार, कोंडीबा कोळी, अक्षय मोरे, विजय याटे, विनोद सुर्यवंशी, अशोक सुरवसे असे 7 पुरुष कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 28,830 ₹ सह आढळले.
2)रोहिदास सुरवसे, रा. चिंचोली (भुयार), ता. उमरगा हे राहत्या घरासमोर कल्याण मटका जुगार साहित्य व 310 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
3)लहु घुले, रा. तेरखेडा, ता. वाशी हे गावातील मारुती मंदीरामागे कल्याण मटका जुगार साहित्य व 1,330 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले.
4)विनोद जगताप, रा. तुळजापूर हे तुळजापूरातील कणे कॅन्टीनच्यामागे मिलन नाईट मटका जुगार साहित्य व 1,430 ₹ रोख रक्कमेसह तर लखन थोरात, रा. काक्रंबा व दत्ता बनसोडे, रा. तीर्थ (खु.) हे दोघे तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटल परिसरात लॅपटॉपवर फन टारगेट हा ऑनलाईन जुगार खेळत असतांना लॅपटॉपसह जुगार साहित्य व 4,980 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना तुळजापूर पोलीसांना आढळले.
अवैध मद्य विरोधी कारवाया
उस्मानाबाद - अवैध मद्य बाळगून महाराष्ट दारु बंदी कायदा कलम- 65 (ई) चे उल्लंघन करणाऱ्या 4 व्यक्तींविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी 24 फेब्रुवारी रोजी खालीलप्रमाणे कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध दारु जप्त केली आहे.
1) पिपळा (बु.) येथील ज्योतीराम पाटील व दुष्यंत शिरसाट हे आपापल्या घरा शेजारी अनुक्रमे 10 लि. व 9 लि. गावठी दारु बाळगले असतांना तामलवाडी पोलीसांना आढळले.
2) सतिश डोलारे, रा. केशेगांव हे आपल्या शेतात देशी दारुच्या 10 बाटल्या विनापरवाना बाळगले असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.
3) महादेवी तेलंग, रा. त्रिकोळी या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगल्या असतांना उमरगा पोलीसांना आढळले.
COMMENTS