वाशी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकाने 04 मार्च रोजी ईट, ता. वाशी येथे छापा मारला. यावेळी ई...
वाशी: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकाने 04 मार्च रोजी ईट, ता. वाशी येथे छापा मारला. यावेळी ईट येथील अशोक नवनाथ हुंबे हे स्वत:च्या पत्रा शेडमध्ये 1)अनिल हुंबे 2)अक्षय देशमुख 3)अमोल सासवडे 4)दादासाहेब थोरात 5)अश्रु थोरात 6)राजेंद्र देशमुख 7)महादेव थोरात 8)सदानंद आसलकर 9)नाना गायकवाड 10)पवन थोरात 11)जयसिंग शिंदे 12)भाऊसाहेब गायकवाड 13)रोहन थोरात 14)विठ्ठल गायकवाड 15)बाबासाहेब डमरे 16)रोशन भोसले 17)अमर आसलकर 18)सुभाष देशमुख 19)गणपती काटे 20)अनिल गायकवाड 21)दस्तगीर पठाण 22)कासम सत्तार 23)अनिल थोरात 24)बाजीराव भोसले, सर्व रा. ईट 25)सुरेश गिते, रा. दिघोळ, ता. पाटोदा 26)आप्पा आवारे, माळेवाडी, ता. जामखेड 27)निलकंठ नलावडे, रा. लांजेश्वर, ता. भुम या सर्वांना एकत्र जमवून तिरट जुगार खेळत व खेळवीत असतांना पथकास आढळले. पथकाने तिरट जुगार साहित्यासह 6 मोटारसायकल व रोख रक्कम 31,890 ₹ असा माल जप्त करुन नमूद सर्वांविरुध्द वाशी पो.ठा. येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम- 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब: इंदीरानगर, कळंब येथील अजीम सत्तार सय्यद हे 05 मार्च रोजी कळंब येथील बाजार मैदानात कल्याण मटका जुगार साहित्य व 5,150 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील प्रताप बाळासाहेब यादव हे 05 मार्च रोजी शहरातील तेरणा मविद्यालयासमोरील पानटपरीमध्ये कल्याण मटका जुगार व रोख रक्कम 700 ₹ बाळगले अतसतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS