उस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात ...
उस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 15 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेली 140 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 97 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारुची एकत्रीत किंमत 12,922 ₹ आहे. यावरुन 15 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पो.ठा. आंबी: नितीन भानुदास उबाळे, रा. आंबी ता. भुम हे आंबी येथील आंबिका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): शंकर तुकाराम थोडसरे व महेश बंडू शिंदे, दोघे रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दोघे अनुक्रमे जुन्या रेल्वे स्थानकाजवळील पत्रा शेडसमोर व येडशी बसस्थानक परिसरात एकत्रीत देशी दारुच्या 25 बाटल्या (किं.अं. 1,300 ₹) बाळगले असतांना आढळले.
वृषभनाथ जैन, रा. किनी, ता. उस्मानाबाद हे हॉटेल एअर पोर्टच्या बाजूस देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. कळंब: शुभम बापु पवार, रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब हे कळंब मार्केट यार्ड परिसरात 18 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) बाळगले असतांना आढळले.
विलास शामराव मडके, रा. मोहा, ता. कळंब हे गावात 05 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 250 ₹) बाळगले असतांना आढळले.
तारामती पवार, रा. वाकडी, ता. कळंब या आपल्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.
पो.ठा. भुम: श्रीनिवास पंडीत पाटील, रा. वालवड, ता. भुम हे गाव शिवारात देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 770 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. ढोकी: गजेंद्र रामा पवार, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर 20 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,220 ₹) बाळगले असतांना आढळले.
शिवाजी रमेश देशमुख, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे गाव शिवारात देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 676 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. आनंदनगर: भगवान सिताराम पवार, रा. सांजा, ता. उस्मानाबाद गावातील गणपती मंदीरासमोर 22 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 930 ₹) बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. मरुम: बाळु मनोहर उपासे, रा. अचलेर हे गाव शिवारात 5 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 520 ₹) बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. बेंबळी: बालाजी पवार, रा. बोरगाव (राजे), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. उस्मानाबाद (श.): लक्ष्मण निचळे, रा. उस्मानाबाद हे शहरातील इंदीरानगर येथे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 800 ₹) बाळगले असतांना आढळले.
पो.ठा. तामलवाडी: सुरेश गणपत काळे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर हे आपल्या घराजवळ 40 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,150 ₹) बाळगले असतांना आढळले.
“जुगार विरोधी कारवाई.”
परंडा: माणकेश्वर, ता. भुम येथील बापु मच्छींद्र अंधारे हे 12 मार्च माणकेश्वर शिवारात सुरट मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 430 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS