जुगार विरोधी कारवाया नळदुर्ग: सुर्यकांत आण्णाराव नळगे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे 18 मार्च रोजी जळकोट येथील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार ...
जुगार विरोधी कारवाया
नळदुर्ग: सुर्यकांत आण्णाराव नळगे, रा. जळकोट, ता. तुळजापूर हे 18 मार्च रोजी जळकोट येथील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 760 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
कळंब: सरफराज बाबर सय्यद, रा. कळंब हे 18 मार्च रोजी मदिना चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 720 ₹ रक्कम बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
उस्मानाबाद (ग्रा.): कृष्णा राजेंद्र सुरवसे, रा. आळणी, ता. उस्मानाबाद हे 18 मार्च रोजी गावातील चौकात ढोकी रस्त्यालगत मिलन नाईट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 360 ₹ रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
अवैध मद्य विरोधी कारवाया
उस्मानाबाद पोलीसांनी काल गुरुवार दि. 18.03.2021 रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 3 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन 3 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 3 गुन्हे नोंदवले आहेत.
1) हावरगाव, ता. कळंब येथील कल्याण रामा पवार हे हावरगा शिवारातील कारखान्याजवळ 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 500 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
2) गंजोटी, ता. उमरगा येथील रुकमया हणमया तेलंग हे गुंजोटी शिवारातील कॅनलच्या बाजूस 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.
3) खानापूर, ता. परंडा येथील शंकर साहेबराव गटकुळ हे सोनारी- आनाळा रस्त्यालगच्या बाजीराव हॉटेलजवळ एका पत्रा शेडमध्ये देशी- विदेशी व बियरच्या एकुण 180 बाटल्या (किं.अं. 17,282 ₹) अवैधपेण विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.
COMMENTS