उस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनी...
उस्मानाबाद - भूम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास आज दि. 16.05.2021 रोजी मिळाली. यावर स्था.गु.शा. चे पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- पांडुरंग माने, पोहेकॉ- धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, अमोल चव्हाण, शेळके, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने नमूद ठिकाणी 13.30 वा. सु. छापा मारला.
यावेळी त्या ठिकाणी एका पत्राशेडच्या बाजूस तानाजी श्रीराम मुंडे, वय 31 वर्षे, रा. हिवर्डा, ता. भुम हे 9 खोक्यांमध्ये एकुण 180 मि.ली. देशी दारुच्या 432 बाटल्या, 180 मि.ली. विदेशी दारुच्या 148 बाटल्या व 1000 मि.ली. विदेशी दारुच्या 20 बाटल्या व मद्य भरण्यासाठी 2 कॅन (एकुण किं.अं. 63,144 ₹) अवैपणे बाळगलेले असताना पथकास आढळले.
यावरुन पोलीस पथकाने नमूद अवैध मद्यासह साहित्य जप्त करुन तानाजी मुंडे यांच्याविरुध्द भुम पो.ठा. येथे महाराष्ट मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जुगार विरोधी कारवाई
शिराढोण : रमाकांत शिवाजी ओव्हाळ, रा. नायगाव, ता. कळंब हे दि. 15.05.2021 रोजी नायगाव शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 775 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS